‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहा’अंतर्गत आदिवासी विकास व आरोग्य विभागाचा संयुक्तं उपक्रम…
प्रतिनिधी | दहिवद, ता. अमळनेर : धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात साजऱ्या होत असलेल्या ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहा’अंतर्गत दहिवद (ता. अमळनेर) येथे बुधवारी, दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी व पोषण जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित या शिबिराला परिसरातील नागरिक व आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात एकूण ५२ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
रक्तदाब, मधुमेह, सिकलसेलसह माता-बाल आरोग्य तपासणी
शासनाचा आदिवासी विकास विभाग व स्थानिक आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या शिबिरात नागरिकांची रक्तदाब, मधुमेह, सिकलसेल तसेच माता-बाल आरोग्य तपासणी करण्यात आली. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना स्थानिक पौष्टिक आहार, परसबाग आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत मोफत औषधोपचारही केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्थानिक आदिवासी नेते, पदाधिकारी तसेच आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्या हस्ते धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे आणि आद्य क्रांतिवीर समशेरसिंग पारधी यांच्या स्मारकाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
शिबिराला लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेचे नेते पन्नालाल मावळे, माजी उपसरपंच प्रवीण आंबा माळी, सामाजिक कार्यकर्ते गणेश (बाळाभाऊ) माळी, यावल प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी खंबायत, शासकीय आश्रमशाळा दहिवदचे मुख्याध्यापक शिरसाठ व अधीक्षक चव्हाण, वैद्यकीय अधिकारी कदम, दहिवद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी घनश्याम पाटील, एएनएम पवार, ग्रामपंचायत प्रशासक सुरेश कठाळे, ग्रामसेवक शेखर धनगर, ताडेपुरा (अमळनेर) येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक रजनीकांत भामरे, कनिष्ठ लिपिक जाकीर शेख यांच्यासह आरोग्य केंद्रातील सर्व परिचारिका व आशा सेविका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील आदिवासी कार्यकर्ते समाधान पारधी, मुकेश पारधी, तेजस पारधी, छायाचित्रकार भागवत पारधी, अजय पारधी, सुनील चव्हाण, नरेश पारधी, दिनेश साळुंके, अनिल चव्हाण, मिथुन चव्हाण, मनोज पारधी, सागर पारधी, प्रमोद पारधी व सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
![]()

