कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सुवर्णपदक; जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेकडून कौतुकाची थाप…
प्रतिनिधी | मारवड, ता. अमळनेर, : मारवड (ता. अमळनेर) येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाची विद्यार्थिनी उज्वला भरत माळी हिने टी. वाय. बी. ए. हिंदी विषयात अभूतपूर्व यश संपादन केले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून हिंदी विषयात विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकावत तिने सुवर्णपदकाचा (गोल्ड मेडल) मान मिळविला आहे. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने हे यश मिळविल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
उज्वलाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आबासो जयंतराव मन्साराम पाटील, उपाध्यक्ष आबासो देविदास शामराव पाटील, सचिव आबाजी देविदास बारकू पाटील, भैय्यासो दिनेश वासुदेव साळुंखे यांच्यासह सर्व संचालक मंडळाने तिचे अभिनंदन करून कौतुक केले. तसेच प्राचार्य डॉ. व्ही. एस. देसले, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनीही तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
![]()

