जीत स्टुडिओतर्फे कष्टकरी, गरजू व विधवा महिलांचा कवयित्री गुंजन पाटील प्रमुख उपस्थितीत गौरव व साडी भेट…
प्रतिनिधी | अमळनेर : जीत स्टुडिओ अँड इव्हेंट मॅनेजमेंटतर्फे रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे आयोजित “आनंदाची साडी, सन्मानाची दिवाळी” हा उपक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. समाजातील कष्टकरी, शेतकरी, घरकाम करणाऱ्या तसेच विधवा महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना साडी भेट देत सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क होता आणि परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयित्री व खान्देशकन्या कु. गुंजन पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. “स्नेहाचा आणि आपुलकीचा उपक्रम” असे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजक जीत स्टुडिओचे संचालक जीत संदानशिव हे होते. आपल्या कष्टाची आणि योगदानाची अशा प्रकारे दखल घेतली गेल्याने सन्मान स्वीकारताना महिलांच्या चेहऱ्यावर समाधान, अभिमान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. उपस्थित नागरिकांनी आयोजकांच्या या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
या कार्यक्रमात कविता ज्ञानेश्वर भिल, उषाबाई राजेंद्र बिऱ्हाडे, साधना पाटील, पूनम रणजित वानखेडे, सुनीता विक्रम भिल, रेजाबाई प्रदीप भामरे, जिजाबाई अनिल बिऱ्हाडे, मंगला रमेश लिंगायत, सुनंदा सुनील पाटील, मीनाबाई संजय संदानशिव, ममता नाना भिल, नंदाबाई युवराज बिऱ्हाडे, सिंधुबाई रमेश सोनवणे, वंदनाबाई सुरेश बिऱ्हाडे, रत्नाबाई बापू बिऱ्हाडे, संगीता शरद भिल, पुंजाबाई मनोज बिऱ्हाडे, प्रियंका मनोहर गव्हाणे, सुरेखा आबा बोरसे, ललिता हेमंत सूर्यवंशी, रंजना एकनाथ पाटील, अरुणाबाई राजू बिऱ्हाडे, नीताबाई नवल वारडे, भारतीबाई रवींद्र बिऱ्हाडे, अनिता आत्माराम खरदे, सोनाली लक्ष्मीकांत पाटील आणि शितल समाधान पाटील या व यांच्या सारख्या अनेक महिलांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले. यांपैकी काही महिला शेतीत राबणाऱ्या, काही घरकाम करणाऱ्या, तर काही विधवा असून आपल्या कुटुंबाचा आधार बनून जिद्दीने जीवन जगत आहेत, याची दखल घेत त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
यंदाच्या दिवाळीत कष्टकरी भगिनींच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात दिव्यांचा प्रकाश पेरून खऱ्या अर्थाने स्नेहाची व आनंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमासाठी सुयश हॉस्पिटल, अमळनेरच्या डॉ. सौ. मनीषा दिनेश पाटील, श्री विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अमळनेरचे डॉ. महेंद्र चव्हाण व डॉ. ज्योती चव्हाण, तसेच गलवाडे रोडवरील नोबल पोदार लर्न स्कूलच्या चेअरमन डॉ. अर्चना प्रशांत सूर्यवंशी व संचालक प्रशांत सूर्यवंशी, रणजित शिंदे सर व पत्रकार चेतन राजपूत यांचे विशेष सहकार्य लाभले. तर कार्यक्रमाचे सुत्र-संचालन लांडगे मॅडम यांनी केले. आयोजकांनी या सर्व सहकार्यकर्त्यांचे तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहून सन्मानार्थी महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार मानले. महिलांच्या कार्याचा असा सन्मान भविष्यातही होत राहावा, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
![]()

