स्वादिष्ट नमकिनजवळील घटना, दोन्ही वाहनांचे नुकसान…
प्रतिनिधी | अमळनेर: गलवाडे रोडवरील स्वादिष्ट नमकिन दुकानाजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गलवाडे रोडने जाणाऱ्या दुचाकी आणि समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाची स्वादिष्ट नमकीनजवळ जोरदार धडक झाली. या अपघातात तनवीर शेख सुपडू मणियार आणि जागीर खा शेर खा पठाण हे दोघे जखमी झाले आहेत. अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी घटनास्थळी माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ता व मा नगरसेवक फिरोज पठाण, अयाज बागवान, नईन पठाण, इरफान मनियार, छोटू भाई, आसिफ बापू यांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी पुढाकार घेतला. जखमींपैकी तनवीर शेख सुपडू मणियार यांना अमळनेर येथील डॉ. अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, जागीर खा शेर खा पठाण यांना अधिक उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे..
सदर अपघाताची नोंद पोलिसांत होण्याची प्रक्रिया सुरू आहे..
![]()

