नगरसेविका स्वप्ना विक्रांत पाटील यांचा दिवाळीनिमित्त सामाजिक उपक्रम…
प्रतिनिधी | अमळनेर : वार्ड क्र. 17 चे नगरसेविका स्वप्ना विक्रांत पाटील यांच्या वतीने दिवाळीनिमित्त सफाई कामगारांना मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू मुलींना सायकलींचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी वर्षभर राबणाऱ्या सफाई कामगारांना दिवाळीचा आनंद मिळावा, या भावनेतून नगरसेवक पाटील यांनी त्यांना मिठाई व फराळ दिला. सणासुदीच्या काळात आपल्या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या या कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
याचबरोबर गरजू मुलींना सायकली देण्यात आल्या. शाळेत जाण्या-येण्यासाठी या सायकलींचा मोठा उपयोग होणार असून मुलींच्या शिक्षणाला हातभार लागणार आहे. सायकल मिळाल्यामुळे मुलींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या या दोन्ही उपक्रमांबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून नगरसेवक विक्रांत पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
![]()

