उपनगराध्यक्ष प्रशांत दादा निकम यांनी प्रभाग १५ मधील सफाई कामगारांना दिले दिवाळीचे गोड उपहार व फराळ वाटप…
प्रतिनिधी | अमळनेर :- शहराची स्वच्छता राखण्यासाठी वर्षभर राबणाऱ्या सफाई कामगारांचा दिवाळीनिमित्त सन्मान करत उपनगराध्यक्ष प्रशांत दादा निकम यांनी प्रभाग क्रमांक १५ मधील कामगारांना दिवाळीचे साहित्य वाटप केले. कामगारांच्या कष्टाची जाणीव ठेवून राबविलेल्या या उपक्रमामुळे त्यांची दिवाळी आनंदात साजरी झाली.
सफाई कामगार पहाटेपासूनच ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता रस्ते, गटारी व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करतात. सण असो वा सुट्टी, त्यांची सेवा कधीही खंडित होत नाही. दिवाळीत तर कचरा वाढल्याने त्यांना अधिकच मेहनत घ्यावी लागते. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळेच आपला प्रभाग आणि आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसते, म्हणूनच त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
वाटप स्वीकारताना सफाई कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसत होता. आपल्या कामाची कदर करून कोणीतरी दिवाळीच्या निमित्ताने आपली आठवण ठेवली, ही भावना त्यांनी व्यक्त केली. निकम यांनी प्रत्येक कामगाराशी संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या सुख-समृद्धीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
सामाजिक भान जपत राबविलेल्या या उपक्रमाचे प्रभागातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
![]()

