महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या (संभाजीराव गट) तालुका कार्यकारिणीची घोषणा; शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्व शिक्षक संघटनांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार…
प्रतिनिधी | अमळनेर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या (संभाजीराव गट) अमळनेर तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, तालुकाध्यक्षपदी श्री. अशोक रघुनाथ पाटील, तर सरचिटणीसपदी श्री. विजय आनंदा पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विलासराव नेरकर यांनी बैठकीत नूतन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली. तालुक्यातील शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संघटना आग्रही भूमिका घेणार असून, सर्व शिक्षक संघटनांना सोबत घेऊन आगामी काळात कामकाज करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष जयवंतराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी राजू देवचंद पाटील, ग.स.चे माजी अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष विलासराव नेरकर आणि जिल्हा संघाचे नेते तथा उपाध्यक्ष वाल्मिक मराठे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांमध्ये समन्वय राखून शिक्षकांच्या न्याय्य मागण्या आणि समस्यांच्या निराकरणासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची भूमिका सर्वानुमते निश्चित करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी राहुल भगवान सोनवणे, कोषाध्यक्षपदी समाधान खैरनार, तर उपाध्यक्षपदी योगेश्वर भाऊराव पाटील, दत्तात्रय बारकू सोनवणे, हिंमत चौधरी आणि ज्ञानेश्वर कुवर यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी हिरालाल धर्मा सैंदाणे, योगेश भदाणे आणि प्रीतम रत्नपारखी यांची नियुक्ती करण्यात आली.
ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून जगदीश भटू पाटील, किशोर देसले, रियाज शेख आणि रवींद्र प्रभाकर पाटील यांची निवड करण्यात आली. तंत्रस्नेही मार्गदर्शक म्हणून सुधाकर पाटील, शंकर बोरसे, नामदेव अहिरे, संदीप सूर्यवंशी, भरत जाधव आणि निलेश मोतीलाल पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.
संघटकपदी विजय बिर्हाडे, सुनील देवरे, जिजाबराव पाटील, हेमंत शिंदे, विलास मोरे, प्रशांत पाटील, कमलेश मोरे, कुणाल पोतदार, सुधीर पाटील, संदीप गुलाबराव पाटील, राजेंद्र संभाजीराव पाटील आणि अरुण पवार यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला अमळनेरचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सरचिटणीस मोहन ताडे, भटू आप्पा शिरसाठ, अमळनेर तालुका शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर चौधरी, प्राथमिक शिक्षक संघाचे (शिवाजीराव गट) अध्यक्ष संदीप वाघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच ज्येष्ठ केंद्रप्रमुख किरण शिसोदे, शरद सोनवणे, चंद्रकांत साळुंखे, वाल्मिक भदाणे, महेश पाटील, सचिन पाटील आणि ग्रेडेड मुख्याध्यापक छगन पाटील यांचीही उपस्थिती होती. बैठकीस तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नूतन कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
![]()

