शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्या मार्फत निवेदन सादर…
प्रतिनिधी | अमळनेर : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी तसेच वंचित घटकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २२ विविध विषयांचे निवेदन सादर करण्यात आले. लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन अमळनेरच्या तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्यामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी आणि समाजातील वंचित घटकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधणे, तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, हा या निवेदनामागील प्रमुख उद्देश आहे. विविध २२ विषयांचा समावेश असलेल्या या निवेदनाद्वारे संबंधित घटकांच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी भूमिका लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने मांडण्यात आली.
यावेळी लोकसंघर्ष मोर्चाचे पन्नालाल मावळे यांच्यासह निलाबाई भिल, आनंद पवार, शरद पाटील, शंकर भिल, गणेश माळी, राजेंद्र पारधी, मधुकर चव्हाण, गणेश पारधी, संजय बारेला, जयदेव पारधी, शांताराम पारधी, हेमंत दाभाडे, भुरा पारधी, धनराज पारधी आदी उपस्थित होते.
![]()

