सत्ताधारी व विरोधक एकत्र; शिवप्रेमींचा नगर परिषद परिसरात जल्लोष…
प्रतिनिधी | अमळनेर : धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला “छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार” असे नाव देण्याचा ठराव नगर परिषदेच्या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी तसेच विरोधी सदस्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
निर्णयाची बातमी कळताच नगर परिषद परिसरात जमलेल्या शिवप्रेमींनी जल्लोष केला. “जय भवानी, जय शिवराय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना पेढे भरवून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला.
शिवप्रेमींनी या निर्णयामुळे शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराला महाराजांच्या नावाने ओळख मिळेल, अशी भावना व्यक्त केली. यावेळी योगेंद्र बाविस्कर, भरत पवार, शुभम पाटील, उज्ज्वल पाटील, अनिरुद्ध शिसोदे, सागर विसपुते, राहुल कंजर, राहुल बडगुजर, अथर्व डेरे, राकेश शेटे, निनाद जोशी, राहुल अहिरे, भागवत पाटील, गणेश पाटील, गोकुळ पाटील, शाम पाटील, मनोज शिंगाणे, चिराग पाटील आदी शिवप्रेमी उपस्थित होते.
![]()

