मुलींच्या कबड्डी संघाने दोन्ही गटांत पटकावले विजेतेपद; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र; मान्यवरांकडून खेळाडूंचे अभिनंदन…
प्रतिनिधी | अमळनेर : शासकीय शालेय कबड्डी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत दोन्ही गटांत विजेतेपद पटकावणाऱ्या अमळनेर येथील डी. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते बुके व सन्मानचषक देऊन गौरव करण्यात आला. या यशाबद्दल खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांनी आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने आयोजित शासकीय शालेय कबड्डी स्पर्धेत डी. आर. कन्या शाळेच्या मुलींच्या संघाने दमदार कामगिरी केली. दोन्ही गटांत विजेतेपद मिळवत संघाने दुहेरी यश संपादन केले असून, या कामगिरीच्या जोरावर संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे दि. २९ व ३० रोजी मॅटवर खेळविण्यात येणार आहे.
या संघात कर्णधार अश्मिरा शाकिर शेख, उपकर्णधार पुनवी निकुंबे, कावेरी पाटील, कल्याणी पारधी, केतकी देशपांडे, इशा पाटील, मयुरी पवार, लीना गुरव, कामिनी सोनवणे, वैष्णवी पाटील, समीक्षा जाधव, रिशिका गोयल, स्नेहल पाटील आणि मोनिका भोई या खेळाडूंचा समावेश आहे. सर्व खेळाडूंनी सांघिक समन्वय, जिद्द आणि खेळातील कौशल्याच्या बळावर हे यश संपादन केले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल शालेय समितीचे चेअरमन भाऊसाहेब जितेंद्र जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, कार्यालयप्रमुख शाम पवार, एस. एस. माळी, सौ. आर. एस. सोनवणे आणि किरण सनेर यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या संघाला क्रीडा विभागप्रमुख सौ. आर. एस. सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी केलेल्या सरावाला आणि मेहनतीला या यशामुळे फलित मिळाले आहे. आता जिल्हास्तरीय स्पर्धेतही अशीच कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल करण्याची संधी खेळाडूंसमोर आहे.
![]()

