बलात्कार व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा, डीवायएसपी विनायक कोते यांच्याकडे तपास…
प्रतिनिधी | अमळनेर : पती व मुलाला फाशी देऊन जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप सानेनगर परिसरातील आनंदा वसंत पाटील याच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४, ३५२, ३५१(४) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(आर)(एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते करीत आहेत.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, पीडित महिलेला आरोपीच्या ओळखीने भाड्याने घर मिळाले होते. महिलेचे पती बाहेरगावी असताना, गेल्या दोन वर्षांपासून आरोपी तिच्या घरी जात असल्याचा आरोप आहे. तसेच, महिलेला तिच्या पतीला दोघांमधील प्रेमसंबंधांबाबत सांगण्याची धमकी देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार, ९ तारखेला सायंकाळी सुमारे सहा वाजता महिलेचा मुलगा शिकवणीसाठी गेला असताना आरोपीने महिलेला पती व मुलाला फासावर लटकवून जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेबाबत महिलेने पती घरी परतल्यानंतर त्याला तसेच आपल्या भावाला माहिती दिली. त्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते करीत आहेत.
![]()

