नाना सोळंखे यांच्याकडे कर्ज समितीची धुरा, तर अशोक इसे यांची कर्मचारी नियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती…
प्रतिनिधी | अमळनेर : जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक पश्चिम सोसायटी, पारोळा येथील विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली. यात नाना सोळंखे यांची कर्ज समितीच्या अध्यक्षपदी, अशोक इसे यांची कर्मचारी नियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी, तर विश्वनाथ गोरक्षनाथ पाटील (चोपडा) आणि भटू काशिनाथ पाटील (मंगरूळ, ता. अमळनेर) यांची तज्ज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली.
पारोळा येथील सोसायटीच्या मुख्य कार्यालयात शनिवारी दुपारी दोन वाजता पतपेढीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत या निवडी पार पडल्या. शिक्षक नेते तथा प्रगती गटाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, शिक्षक नेते आर. जे. पाटील आणि राजेंद्र सांळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया राबविण्यात आली.
या सभेला सचिन वाघ, संभाजी पाटील, संदीप पाटील, रवींद्र पाटील, भरत जाधव आणि यशवंत शिंदे उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पतपेढीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, विविध शिक्षक संघटना तसेच जिल्हा परिषद शाळांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
![]()

