पोलीस प्रशासन व होमगार्ड विभागातील समन्वयावर चर्चा; वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर पोलीस ठाण्यात आढावा भेटीदरम्यान तत्कालीन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव अशोक नखाते यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव यांच्यासोबत विविध प्रशासकीय बाबींवर चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचा सत्कार प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव यांचा सत्कार उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम, होमगार्डचे अमळनेर तालुका समादेशक गोपाल वना पाटील, कंपनी नायक अरुण नेरकर, वरिष्ठ पलटण नायक रविंद्र ठाकूर, तसेच जळगाव पीटीसीचे कैलास पाटील, कमलेश वानखेडे यांच्यासह पोलीस व होमगार्ड विभागातील अधिकारी उपस्थित होते.
सदिच्छा भेटीत पोलीस प्रशासन आणि होमगार्ड विभागातील समन्वयासह विविध प्रशासकीय बाबींवर चर्चा झाली. या भेटीमुळे दोन्ही विभागांतील परस्पर समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
![]()

