जायन्ट्स सप्ताहानिमित्त उपक्रम; विद्यार्थ्यांना रक्तगटाचे ओळखपत्रही वाटप…
प्रतिनिधी | अमळनेर : जायन्ट्स ग्रुपतर्फे जायन्ट्स सप्ताहानिमित्त मंगरूळ येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयातील १०५ विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर विद्यार्थ्यांना रक्तगट नमूद असलेले ओळखपत्रही मोफत देण्यात आले.

जायन्ट्स सप्ताहानिमित्त १७ ते २३ सप्टेंबरदरम्यान अमळनेर तालुक्यात विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वृक्षारोपण, पुस्तक वाटप, रांगोळी व वक्तृत्व स्पर्धा, आरोग्य तपासणी, रक्तगट तपासणी तसेच एआय तंत्रज्ञानावरील प्रशिक्षणाचा समावेश आहे. हे सर्व उपक्रम मोफत घेण्यात येत आहेत.
मंगरूळ येथील विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या १०५ विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. जीवनश्री ब्लड बँकेचे संतोष वाघ, महेश पाटील व संजय मुंडके यांनी तपासणीसाठी सहकार्य केले.
यावेळी जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ. महेश पाटील, उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र चौधरी, संस्थापक अध्यक्ष सुनील पाटील व खजिनदार राजेंद्र पाटील यांच्यासह मुख्याध्यापक प्रकाश पाटील, अशोक सूर्यवंशी, प्रभुदास पाटील, संजय पाटील, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, सीमा मोरे, सीमा पाटील, प्रवीण पाटील, मनोज पाटील, सुदर्शन पवार, राहुल पाटील, प्रदीप पाटील व खुशाल पाटील उपस्थित होते.
![]()

