प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांचा पुढाकार; वृक्षांचे महत्त्व व प्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती…
प्रतिनिधी | अमळनेर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील आंतरवासिता अंतर्गत प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांनी अमळनेर येथील जी. एस. हायस्कूलमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. प्राध्यापक डॉ. सुनंदा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
उपक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व, वृक्षसंवर्धनाची गरज तसेच वाढत्या प्रदूषणाचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवडीसोबतच लावलेल्या वृक्षांचे नियमित संवर्धन करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थी प्रतीक्षा पाटील, निकिता पाटील, रुचिका पाटील, नेहा पाटील, नूतन पाटील, सोनल पाटील आणि प्रज्ञा पाटील यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाची भूमिका अधोरेखित केली.
यावेळी जी. एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोद कदम तसेच शिक्षक आर. जे. पाटील उपस्थित होते. प्रत्येकाने वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारल्यास पर्यावरण संतुलन राखण्यास हातभार लागेल, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
![]()

