धरणगाव नगरपरिषदेतून अमळनेर नगरपरिषदेत आरोग्य विभागात स्वच्छता निरीक्षक म्हणून बदली; नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे ३० ऑक्टोबरचे आदेश…
अमळनेर | प्रतिनिधी : धरणगाव नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक संतोष पंढरीनाथ बिऱ्हाडे यांची पुन्हा अमळनेर नगरपरिषदेत आरोग्य विभागात स्वच्छता निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे लेखी आदेश दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी प्राप्त झाले असून, त्यानुसार त्यांनी अमळनेर पालिकेत पदभार स्वीकारला आहे.
संतोष बिऱ्हाडे हे मूळ अमळनेर येथील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून ते अमळनेर पालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत होते. स्वच्छता निरीक्षक म्हणून बढती मिळाल्यानंतर अमळनेर पालिकेत पदभार स्वीकारला. या काळात आरोग्य विभागाचे काम त्यांनी उत्कृष्टपणे सांभाळून शहर स्वच्छ राखण्यास मोलाची भूमिका पार पाडली. विशेष करून कोरोना काळात काळजीने जबाबदारी त्यांनी सांभाळून उल्लेखनीय काम केले.
एक वर्षांपूर्वी त्यांची प्रशासकीय बदली धरणगाव पालिकेत झाली होती. आता पुन्हा अमळनेर पालिकेत त्यांची बदली झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कामाच्या पद्धतीचा फायदा पुन्हा एकदा अमळनेर शहराच्या स्वच्छतेला होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
![]()

