DL Social Foundationच्या वतीने पहिल्या बॅचला उत्साहात सुरुवात…
प्रतिनिधि | अमळनेर : महिला व विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्याचे प्रशिक्षण मिळावे आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवाहात सक्षम करता यावे, या उद्देशाने DL Social Foundation तर्फे सुरू करण्यात आलेल्या “संगणक प्रशिक्षण अभियान – २०२६” अंतर्गत पहिल्या बॅचचा शुभारंभ आज उत्साहात संपन्न झाला.

या प्रशिक्षणाचा शुभारंभ संस्थेच्या संचालक सौ. भावना समाधान मैराळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यावेळी प्रशिक्षणार्थी महिला तसेच संस्थेचे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.
या अभियानाच्या पहिल्या बॅचमध्ये 10 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. प्रशिक्षणादरम्यान संगणकाचे मूलभूत ज्ञान, MS Word, Excel, PowerPoint, मराठी व इंग्रजी टायपिंग, Internet व Online Services, Email व Digital व्यवहार तसेच Cyber Safety यासारख्या विषयांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सध्याच्या डिजिटल युगात संगणकाचे ज्ञान हे शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. विशेषतः महिलांना डिजिटल कौशल्य प्राप्त झाल्यास त्यांना रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या विविध संधींचा लाभ घेता येऊ शकतो. या उद्देशाने संस्थेने महिला व विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतला आहे.
यावेळी बोलताना संस्थेच्या संचालक सौ. भावना समाधान मैराळे यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देत डिजिटल कौशल्याचा नियमित सराव करून त्याचा उपयोग शिक्षण, रोजगार व स्वावलंबनासाठी करण्याचे आवाहन केले.
“ज्ञान, कौशल्य आणि डिजिटल सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिला व विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवणे” हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. प्रशिक्षणाचे आयोजन मा. गायत्री कॉम्प्युटर, मराठा मंगल कार्यालयाजवळ, अमळनेर येथे करण्यात आले आहे.
![]()

