१० वर्षीय विरेन्द्रसह वडील आण्णा तलवारे यांचा मृत्यू; घटनेने खेडी-खौशी परिसरात हळहळ…
प्रतिनिधि, अमळनेर : तालुक्यातील खौशी येथील तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत आण्णा एकनाथ तलवारे (वय ३२) आणि त्यांचा १० वर्षीय मुलगा विरेन्द्र आण्णा तलवारे, रा. खवशी, ता. अमळनेर, यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
प्राथमिक माहितीनुसार, खौशी येथील तलावात ही दुर्घटना घडली. वडील आणि मुलाचा एकाच घटनेत मृत्यू झाल्याने तलवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्याची कार्यवाही करण्यात आली. मात्र बाप-लेक तलावात नेमके कोणत्या परिस्थितीत बुडाले, याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या दुर्दैवी घटनेमुळे खौशी गावात शोककळा पसरली असून, घटनेचा पुढील तपास आणि अधिकृत माहिती मिळाल्यानंतर दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

