महसूल विभागाची कारवाई; ट्रॅक्टर-ट्रॉली तहसील कार्यालयात जमा, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू…
प्रतिनिधी | अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथे अवैधरित्या गौण खनिज (रेती) वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडून ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केली आहे. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मांडळ परिसरात बेकायदेशीररीत्या रेती वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार महसूल पथकाने सापळा रचून MH-17 क्रमांकाचे ट्रॅक्टर ताब्यात घेतले. जप्त केलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
या कारवाईत मंडळ अधिकारी बाबरे, ग्राम महसूल अधिकारी संदीप माळी, पी. आर. पाटील व अमोल पाटील, तसेच जावखेडा येथील तलाठी आणि बावणे यांच्यासह महसूल पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
![]()

