‘भारतीय ऊर्जा क्षेत्र : आव्हाने आणि उपाय’ या विषयावरील प्रकल्पाला प्रथम क्रमांक; गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान…
अमळनेर | प्रतिनिधी : समग्र शिक्षण, जिल्हा परिषद जळगाव आणि गटसाधना केंद्र, पंचायत समिती अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान मेळावा २०२६ मध्ये खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी मयुरी संदीप महाजन हिने ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र : आव्हाने आणि उपाय’ या विषयावरील प्रकल्प सादरीकरणात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय यशाबद्दल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांच्या हस्ते मयुरी महाजन हिला बक्षीस देऊन तिचा गौरव करण्यात आला. तिच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि सर्जनशील प्रकल्प सादरीकरणाला उपस्थितांकडून दाद मिळाली.
मयुरीच्या या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष तथा शाळा समितीचे चेअरमन भाऊसो जितेंद्रजी जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, श्रीमती आर. एस. सोनवणे, श्री. एस. एस. माळी, श्री. के. पी. सनेर, श्री. श्याम पवार, श्रीमती एस. एस. कसबे तसेच सर्व विज्ञान व गणित शिक्षिका, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
मयुरीच्या या यशामुळे श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, विद्यार्थिनींच्या वैज्ञानिक जिज्ञासेला आणि संशोधनवृत्तीला नवी प्रेरणा मिळाली आहे.

