SIR च्या वाढत्या कामाच्या ताणाला विरोध; घरगणनेचे काम BLO यांच्याकडून न करून घेण्याची मागणी…
अमळनेर | प्रतिनिधी : SIRच्या वाढत्या कामाच्या ताणासह विविध मागण्यांसाठी अमळनेर तालुका BLO न्याय हक्क समितीच्या वतीने सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन देण्यात आले. BLO शिक्षकांच्या कामाचा अतिरिक्त भार, मानधन, कार्यालयीन वेळेतील आदेश तसेच घरगणनेच्या कामासंदर्भातील आक्षेप या निवेदनातून मांडण्यात आले.
जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या, पत्रात घरगणनेचे काम BLO यांनी करावे, असा स्पष्ट उल्लेख नसतानाही तसेच SIR च्या अधिकृत वेळापत्रकातही घरगणनेचा उल्लेख नसताना पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून BLO वर हे काम सोपविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप समितीने केला. त्यामुळे घरगणनेचे काम BLO कडून करून घेऊ नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, ERO व AERO यांना अनुक्रमे ३० हजार व २५ हजार रुपये मानधन मंजूर करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर BLO यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार योग्य मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
वरिष्ठ स्तरावरून वारंवार तसेच अवेळी दिले जाणारे आदेश केवळ कार्यालयीन वेळेत आणि लेखी स्वरूपात देण्यात यावेत. तसेच BLO यांना वारंवार कारवाईच्या धमक्या देण्याचे प्रकार थांबवावेत, अशी मागणी समितीने केली. निवडणूक कामाचा अतिरिक्त भार लक्षात घेता BLO यांना एक वाढीव वेतनवाढ देण्यात यावी, तसेच कामाच्या प्रमाणानुसार जनगणनेच्या धर्तीवर अर्जित रजा मंजूर करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रांताधिकारी स्तरावरील मागण्या तातडीने मान्य कराव्यात आणि वरिष्ठ स्तरावरील मागण्यांसाठी शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करावा, अशी विनंती समितीने केली.
निवेदनावर भगवान एकनाथ पाटील, राजेंद्र गुलाबराव चौधरी, शाम भालेराव वाघ, अजय भगवान भामरे, दिनेश विक्रम शिरसाठ, भूषण सुरेश महाले, सुरेश बाबुराव वाडीले, जितेंद्र जिजाबराव पाटील, नामदेव संतोष अहिरे, रवींद्र त्र्यंबक महाजन, आशिष धरमसिंग राजपूत, प्रसाद प्रभाकर जोशी, रियाज अहमद शेख, रामेश्वर तुकाराम भदाणे, ज्ञानेश्वर तुकाराम गांधलीकर, राजेंद्र दयाराम पारील, मकरंद रमेश निळे, उज्वल अशोक मार्कंडेय, अतुल राजाराम भोई, किरण सुरेश ठाकूर, अजय वि. बोरसे, चंद्रकांत भिला पाटील, विशाल संजय साळुंखे, गोविंदा बळीराम माळी, डॉ. कुणाल मुरलीधर पवार, गिरीश युवराज पाटील, गणेश शामराव चव्हाण, प्रदीप नाना सैंदाणे, प्रफुल्ल शरद भदाणे, श्रीमती सुषमा नारायण तायडे, कविता पाटील, मनिषा बन्सीलाल पाटील, विकास सुंदरलाल चौधरी, जगदिश शिवाजी पाटील, सुधीर शांताराम चौधरी, हर्षल सतिबराव सोनवणे, संजीव विठ्ठल पाटील, प्रेमराज पवार, सागर आधार महाजन, ज्ञानेश्वर छबिलाल भदाणे, राहुल चैतन्य महाजन, राहुल राजेंद्र पाटील, भटेश्वर नानाभाऊ भदाणे, भरत रामदास पाटील, जयेश हेमलाल लोहार, नरेश यशवंत पाटील, प्रशांत विजयराव कापडणे, सुधीर अनिक पाटील, भुपेंद्र बळीराम वानखडे, गुलाब सकाराम बोरसे, सुमेध मनोहर मोहिते, महेंद्र अर्जुन रत्नपारखी, चिंतामण हेमराज धनके, धिरज रतिलाल कोठवाल, प्रदीप सुखदेव पाटील, कैलास रामधर बाविस्कर, जितेंद्र वसंत वाणी, विनित सुधाकर कुळकर्णी, राहुल भानुदास देसले, अजय मोतीलाल महाजन, म. आसिम अ. नईम, विनोद गुलबराव भदाणे, दिनेश सुरेश कार्लेकर, विकास गोपीचंद पाटील, जयवंत भीमराव पाटील, ज्ञानेश्वर बापू मोरे, आर. आर. पाटील, नंदलाल हिंमतराव पाटील, अरविंद मुकुंदराव भामरे, विनोद गुलाबराव पाटील, महेश धर्मा बोरसे यांच्यासह शेकडो BLO शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, निवेदनातील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वरिष्ठ पातळीवर योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी दिले. यावेळी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार प्रशांत धमके उपस्थित होते.

