जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना साद…
प्रतिनिधी | अमळनेर: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका महायुतीतर्फे आज, मंगळवारी (२४ नोव्हेंबर २०२६) सायंकाळी ५.०० वाजता भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. धुळे रोडवरील कलागुरू मंगल कार्यालयात हा मेळावा होणार असून, तालुक्यातील पदाधिकारी, सोसायटी ठरावधारक आणि जिल्हा बँकेचे मतदार यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मेळाव्यास जळगाव जिल्ह्यातील सर्व मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सर्व उमेदवारही व्यासपीठावर हजेरी लावणार असल्याने मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अमळनेर तालुक्यातील सहकार क्षेत्राच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पदाधिकारी, सोसायटीचे ठरावधारक मतदार आणि जिल्हा बँक निवडणुकीतील सर्व मतदार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होत आहे. महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, तसेच तालुक्यातील सर्व सोसायटी ठरावधारक आणि मतदारांनी मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.
मेळावा मंगळवारी, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता कलागुरू मंगल कार्यालय, धुळे रोड, अमळनेर येथे होईल. महायुती अमळनेर तालुक्याच्या वतीने सर्वांना सस्नेह निमंत्रण देण्यात आले आहे.
![]()

