उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस महिनाभर प्रायोगिक तत्त्वावर धावणार; नियमित सेवेबाबत प्रवाशांच्या प्रतिसादानुसार निर्णय…
प्रतिनिधी | अमळनेर : उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे अमळनेर रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी रेल्वेगाडीला हिरवे झेंडे दाखवून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. या विशेष रेल्वेसेवेमुळे अमळनेरसह परिसरातील प्रवाशांना प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई उदय वाघ यांच्या प्रयत्नांतून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही विशेष रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. ही गाडी प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी चालविण्यात येणार असून, या कालावधीत प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद विचारात घेऊन ती नियमितपणे दररोज सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे या रेल्वेगाडीला प्रवाशांचा कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करणे आणि परिसरातील रेल्वेसेवेचा विस्तार करणे यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. नव्या रेल्वेसेवेच्या स्वागतामुळे अमळनेर रेल्वे स्थानकावर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या स्वागत कार्यक्रमाला मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, माजी अध्यक्ष हरचंद लांडगे, माजी झेड.आर.सी. सदस्य प्रितपाल बग्गा, दिलीप ठाकूर, दीपक भोई, सुरेश बाविस्कर, सुभाष पाटील, कैलास पाटील, पटवर्धन सर, शेखर कुलकर्णी, मछिंद्र पाटील, अनिस खाटीक, युवा मोर्चा अध्यक्ष राहुल चौधरी, कल्पेश पाटील, शिवकिरण बोरसे, समाधान पाटील, विजय पाटील, राजेश खराडे, सागर पाटील, सुमित राजपूत, स्वप्निल पाटील, प्रवीण पाटील, शंतनु भावसार, शैलेश पाटील, मनोहर सोनवणे, निलेश पाटील, रोहन कलोसे, योगेश बडगुजर आणि प्रितराज बग्गा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, रेल्वे प्रवासी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()

