रघुनाथ मोरे यांच्या सूचनेनंतर अग्निशमन दलाची तत्परता; कुत्र्याला सुखरूप बाहेर काढले…
प्रतिनिधी | अमळनेर : शहरातील रमाई नगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटच्या जिन्याखाली अडकलेल्या कुत्र्याची अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) रात्री ८ वाजेच्या सुमारास सुखरूप सुटका केली.
रमाई नगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटच्या जिन्याखाली कुत्रा अडकल्याचे रघुनाथ मोरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत अमळनेर अग्निशमन दलाला सूचित केले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि आवश्यक प्रयत्न करून अडकलेल्या कुत्र्याची सुखरूप सुटका केली.
या बचावकार्यात अग्निशमन दलाचे कर्मचारी दिनेश बिर्हाडे, रफिक पठाण आणि आकाश संदानशिव यांनी सहभाग घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे कुत्र्याला सुरक्षितपणे बाहेर काढता आले.
![]()

