मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेची मागणी…
प्रतिनिधी | अमळनेर : निवडणूक प्रक्रियेतील कथित मतचोरी आणि गैरप्रकारांच्या आरोपांविरोधात अमळनेर येथे नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) च्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. मतचोरीच्या आरोपांची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करावी आणि निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे कार्य करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या आंदोलनातून असत्यावर सत्याचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय या सणाच्या संदेशाच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात भूमिका मांडण्यात आली. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करणे ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत जनतेचा विश्वास कायम राखणे आवश्यक असल्याचे एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने कोणत्याही राजकीय पक्षाच्या हितापेक्षा संविधानिक मूल्ये आणि नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराला प्राधान्य द्यावे. मतचोरीच्या आरोपांची पारदर्शक चौकशी करून निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांचे निराकरण करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. लोकशाहीचे रक्षण, घटनात्मक संस्थांची स्वायत्तता आणि निष्पक्ष निवडणुका यांसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
या आंदोलनावेळी ॲड. कौस्तुभ पाटील (जिल्हाध्यक्ष, एनएसयूआय), महेश पाटील (जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस), उमेश संदानशिव (तालुकाध्यक्ष, एनएसयूआय), बी. के. सूर्यवंशी (अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी), गजेंद्र साळुंखे (शहराध्यक्ष), माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम बापू पाटील यांच्यासह धनगर दला पाटील, मनोज दाजीबा पाटील, संदीप घोरपडे, रज्जाक शेख, सईद तेली, प्रताप पाटील, रोहिदास दाजी पाटील, श्याम पवार, अशोक पवार, पी. वाय. पाटील, दिनेश पवार, मयूर पाटील, हरिभाऊ मारवडकर, बाळा आप्पा पाटील, राजेंद्र भाट, हर्षल जाधव, तौसिफ तेली, अशोक पारधी, नरेश चव्हाण, प्रशांत चव्हाण, हिमांशू पाटील, प्रशांत बाविस्कर, मयंक चव्हाण, हर्षल बडगुजर, आकाश भिल, बंटी खैरनार, प्रवीण पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
![]()

