शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते गौरव…
प्रतिनिधी | अमळनेर : येथील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे उपक्रमशील उपशिक्षक पवन नामदेव पाटील यांना अस्पायर फाउंडेशनतर्फे ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. नाशिक येथील संजीवनी ए. सी. बँक्वेट हॉल अँड लॉन्स (नांदूर नाका) येथे रविवार, १८ ऑक्टोबर रोजी आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
अस्पायर फाउंडेशनतर्फे या पुरस्कारासाठी ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशन प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांची छाननी केल्यानंतर पवन पाटील यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पवन पाटील यांना शाल, फेटा, श्रीफळ, सन्मानपत्र, ट्रॉफी आणि आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे त्यांच्या शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
पवन पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल जळगाव जिल्हा खाजगी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेचे संचालक स्वप्नील पाटील, आशिष पवार आणि महेंद्र रामोशे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि अमळनेर परिसरातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
![]()

