सती माता मंदिराजवळ पहाटेची घटना; अग्निशमन दलाने तातडीने आग विझवली…
प्रतिनिधी | अमळनेर : सती माता मंदिराजवळ आज, शनिवारी पहाटे ४ वाजून ४८ मिनिटांनी साईबाबा ट्रान्सपोर्ट, सुरत यांच्या कपड्यांनी भरलेल्या आयशर वाहनाला आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती अमळनेर पोलीस स्टेशनकडून मिळताच अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांनी अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी रवाना केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने कार्यवाही करत वाहनाला लागलेली आग पूर्णपणे विझवली.
पहाटेच्या सुमारास वाहनाला आग लागल्याची सूचना मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग विझविण्याचे काम हाती घेतले. जवानांच्या प्रयत्नांमुळे आग पूर्णपणे विझविण्यात आली. या घटनेत वाहनातील कपड्यांचे किती नुकसान झाले, तसेच आग लागण्याचे नेमके कारण काय, याबाबतची माहिती उपलब्ध झालेली नाही.
या अग्निशमन मोहिमेत वाहनचालक फारूक शेख, भिकन पठाण, फायरमन दिनेश बिऱ्हाडे, आनंदा झिंम्बल आणि आकाश संदानशिव यांचा सहभाग होता.
![]()

