१७ वर्षांखालील गटात विजय मिळवत संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; शाळेच्या पदाधिकाऱ्यांकडून खेळाडूंना शुभेच्छा…
प्रतिनिधी | अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी. एस. हायस्कूल, अमळनेर येथील १७ वर्षांखालील गटातील खो-खो संघाने विजय मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश केला आहे. हा संघ गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी जळगाव येथील व. वा. वाचनालयात आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहे.
या संघात कर्णधार दुर्गेश सोनवणे याच्यासह कुणाल पवार, यश मिस्त्री, अनंत संदानशिव, लक्षराज पाटील, नाविण्य धनगर, वैभव गुरव, तेजस पाटील, मयूर पाटील आणि चेतन पाटील या खेळाडूंचा समावेश आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा नावलौकिक वाढविण्याचे आव्हान या खेळाडूंसमोर असणार आहे.
संघाला खान्देश शिक्षण मंडळाचे शालेय समितीचे चेअरमन अण्णासाहेब श्रीहरी भिका वाणी, मुख्याध्यापक व्ही. एम. पाटील, उपमुख्याध्यापक सी. एस. सोनजे, के. पी. पाटील, क्रीडा विभागप्रमुख के. आर. बाविस्कर, शिक्षक प्रतिनिधी आर. जे. पाटील व पी. एस. काटकर यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संघाला मार्गदर्शन करणारे जे. व्ही. बाविस्कर आणि के. डी. साळुंखे यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
जिल्हास्तरीय स्पर्धेत जी. एस. हायस्कूलचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
![]()

