आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिनानिमित्त समाजकार्य महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम…
अमळनेर | प्रतिनिधी – आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिनानिमित्त मेरा युवा भारत, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. मंगळवारी, दि. १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात अमळनेर अग्निशमन विभागाने विद्यार्थ्यांना आग प्रतिबंधक उपाययोजना, अग्निशामक यंत्रांचा वापर आणि आपत्तीच्या वेळी करावयाच्या बचावकार्याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.
अग्निशमन अधिकारी श्री. गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालक फारुख शेख, फायरमन दिनेश बिन्हाडे आणि फायरमन आकाश संदानशिव यांनी आगीचे प्रकार, आग विझविण्याच्या पद्धती आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी याविषयी माहिती दिली.
अलीकडील पूरपरिस्थितीत मदतकार्यात योगदान देणारे युवक जिगर शिंदे आणि दीपक पाटील यांचा, तसेच अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी व त्यांच्या पथकाचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. जगदीश सोनवणे होते. कार्यक्रमाला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे, प्रा. डॉ. सागरराज चव्हाण, प्रा. डॉ. भरत खंडागळे, प्रा. डॉ. अस्मिता सरवैया, प्रा. डॉ. श्वेता वैद्य आणि प्रा. डॉ. आर. डी. ढगे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. मेरा युवा भारत, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी श्री. अभिषेक चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मेरा भारत अमळनेरचे तालुका समन्वयक व आपदा मित्र सागर कोळी यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. डॉ. अनिता खेडकर यांनी आभार मानले.
आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या वेळी सतर्कता आणि आपत्तीनंतर मदतकार्य यांविषयी जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
![]()

