हजरत चांदशाह वली उर्सानिमित्त गरीब-गरजूंना अन्नवाटप; सामाजिक एकतेचा संदेश…
प्रतिनिधी | अमळनेर : शहरातील कसाली मोहल्ल्यात हजरत चांदशाह वली यांच्या उर्सानिमित्त भव्य लंगर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात शहरातील विविध भागांतील गरीब, गरजू व निराधार नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
मुस्लिम समाजाच्या वतीने यंदापासून पीर हजरत चांदशाह वली यांच्या नावाने या लंगरचे आयोजन करण्यात आले. उर्साच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा लंगर सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला ठेवण्यात आला होता. उपस्थितांसाठी गौड भात, तिखट भात यांसह विविध खाद्यपदार्थांची व्यवस्था करून त्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामागे धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी, परस्पर बंधुभाव आणि मानवतेची भावना वृद्धिंगत करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. लंगरमध्ये सहभागी नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास नगरसेवक नासिर हाजी, नगरसेवक नवीद शेख, माजी नगरसेवक फिरोज पठाण, इमरान शेख कादर, जाकिर पठाण, मोहम्मद साबिर, नईम पठाण, वहाब भाई, जाकिर मिस्त्री, कलीम मिस्त्री, इब्राहिम सर, सादिक भाई, इमरान अली सैय्यद, अफसर पठाण, राजा भाई, अल्ताफ शाह, बजाज शेख, मोहम्मद जाविद, दानिश शेख, रिजवान शेख, आसीफ मेवाती, तोसिफ पहलवान, अमीर भाई, अदनान मनियार, रेहान पठाण यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
![]()

