माय भारत स्वयंसेवक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश…
प्रतिनिधी | अमळनेर : सेवा संकल्प अभियान व सेवा पंधरवड्यानिमित्त कळमसरे येथील सती माता मंदिर परिसरात माय भारत स्वयंसेवकांच्या वतीने प्लास्टिकमुक्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. माय भारत अमळनेर तालुका स्वयंसेवक सागर कोळी यांच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमात समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
मेरा युवा भारत, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, रासेयो कार्यक्रमाधिकारी विजयकुमार वाघमारे व प्रा. अनिता खेडकर यांच्या मार्गदर्शनाने अभियान पार पडले. विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा संकलित करून परिसराची स्वच्छता केली.
यावेळी नागरिकांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून स्वच्छ परिसर, सुंदर परिसर आणि प्लास्टिकमुक्त पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.
अभियानात तेजस्विनी, अनुजा, जान्हवी, रत्ना, कीर्ती, मयुरी, जान्हवी माळी, सुमित, क्रिश, धम्मदीप, कल्पेश, दीपक, सुशील व राजेंद्र या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
![]()

