एकाचा जागीच मृत्यू, सोबतची मुलगी बचावली….
प्रतिनिधी | अमळनेर : प्रताप कॉलेज परिसरातील उड्डाणपुलावर आज दुचाकीचा अपघात होऊन एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेला व्यक्तीचे नाव हे विजय भार्गव असून, भार्गव हे दुचाकीवरून जात असताना उड्डाणपुलावर वाहनावर नियंत्रण सुटून त्यांचा भीषण अपघात झाला. यावेळी त्यांच्या सोबत एक मुलगीदेखील दुचाकीवर होती. अपघातात भार्गव यांचा जागीच मृत्यू झालेला आहे.
अपघातानंतर विजय भार्गव यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मयत घोषित केले.
दरम्यान, अपघातातील मुलीला उपचारासाठी एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास व कार्यवाही सुरू आहे.
![]()

