फिरोज पठाण मा. नगरसेवक मित्र परिवार, कसाली मोहल्लातर्फे उपक्रम…
प्रतिनिधी | अमळनेर : गणेशोत्सवानिमित्त फिरोज पठाण मा. नगरसेवक मित्र परिवार, कसाली मोहल्ला यांच्यातर्फे पवन पुत्र व्यायामशाळा मंडळ, भोईवाडा यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमातून हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास DYSP विनायक कोते, पोलीस निरीक्षक निकम साहेब, API काकळीजी साहेब, फिरोज पठाण मा. नगरसेवक, मा. उपनगराध्यक्ष बीजू नाना, नगरसेवक पंकज भोई यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पवन पुत्र व्यायामशाळा मंडळाचे अध्यक्ष आबा भोई, सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाने यांच्यासह इमरान शेख कादर, जाकिर पठाण, सईद पठाण, मस्तान मिस्त्री, अरमान हलवाई, सईद हाजी, वसीम पठाण, इरफान मनयार, अशपाक तेली, नईम पठाण आणि अफसर पठाण उपस्थित होते.
गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वाढविण्याचे माध्यम ठरावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार सोहळ्यात विविध समाजघटकांनी एकत्र येत परस्परांच्या सण-उत्सवांचा आदर करण्याचा संदेश दिला. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
![]()

