अहिल्या माता मंदिरामागील घटना; मध्यरात्री अग्निशमन दलाची तत्पर कारवाई…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर शहरातील ताडेपुरा भागात अहिल्या माता मंदिराच्या मागे गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास बापू जगन्नाथ धनगर आणि मंगलाबाई बारकू पवार यांच्या टपऱ्यांना आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती महेंद्र बिर्हाडे यांनी दूरध्वनीद्वारे दिल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग पूर्णपणे विझवली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन वाहन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग पूर्णपणे विझवली. या मोहिमेत फारूक शेख, भीकन पठाण, आनंदा झिंबल आणि दिनेश बिर्हाडे यांनी सहभाग घेतला.
मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ हालचाल निर्माण झाली. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहोचून आग विझविल्याने पुढील अनर्थ टाळण्यासाठी मदत झाली. आगीचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीचा तपशील उपलब्ध झालेला नाही.
![]()

