संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निवेदन…
प्रतिनिधी | अमळनेर : निहारिका कोळी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी समस्त अमळनेर तालुक्यातील समाजबांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
निहारिका कोळी यांच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट व्हावे आणि या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर यावी, यासाठी सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही निवेदनकर्त्यांनी केली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित यंत्रणेने निष्पक्षपणे चौकशी करावी, मृत निहारिका कोळी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे. या प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही समाजबांधवांनी केली आहे.
याप्रसंगी भूषण कोळी, रावसाहेब कोळी, भिकन कोळी, हिरामण कोळी, मधुकर सोनवणे, सागर कोळी, शरद पाटील, स्वप्निल पाटील, विनोद सोनवणे, चेतन कोळी यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
![]()

