विद्यार्थ्यांना सत्य, अहिंसा व स्वच्छतेच्या विचारांचे मार्गदर्शन…
प्रतिनिधी | मंगरूळ : तालुक्यातील मंगरूळ येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांच्यासह दादासाहेब संजय पाटील, प्रभुदास पाटील, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, सीमा मोरे, सीमा पाटील, प्रवीण पाटील, मनोज पाटील, खुशाल पाटील तसेच वस्ती शाळेचे मुख्याध्यापक भटू पाटील आहेर व शिक्षकवृंदाने गांधीजी आणि शास्त्रीजींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व स्वच्छतेच्या विचारांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. गांधीजींच्या विचारांचा अंगीकार करून स्वच्छता व सामाजिक जबाबदारी जपण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()

